There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
१३ वर्षांच्या प्रवासात, आजवर केलेल्या सगळ्या कामात कोणती गोष्ट कायम असेल तर ते लिखाण, शब्द.
Advertising, Marketing, Branding यामध्ये शब्दांना प्रचंड महत्व आहे.
तुम्ही काय शब्द वापरता त्यावरून तुमचं Perception बिल्ड होत असतं.
शब्द होत्याचं नव्हतंही करतात आणि शून्यातून मोठे Empire सुद्धा उभे करतात.
कित्येकवेळा असंही पाहिलं आहे की एकवेळ Aesthetics नाही तर शब्दांमुळे Conversions जास्त मिळाले.
अर्थात हे अनेक Experiments केल्यानंतरच सगळ्या क्लायंट्सच्या कामात Execute केलं.
सुरुवात कुठं झाली? तर गेले २०१०-११ पासून लिहितोय. मोठा प्रवास आहे.सुरुवात झाली कॉलेजमध्ये असताना एकांकिका लिहिण्यापासून (छोटं नाटक, मोठं नाटक दोन अंकी असतं आणि छोटं नाटक ज्याला एकांकिका म्हणतात).काही एकांकिका लिहिल्या, काहींना दिग्दर्शन म्हणून काम केलं, काहींमध्ये स्टेजवर काम केलं, काहींना बॅकस्टेज काम केलं. यात माझं खूप उत्तम असं Foundation तयार झालं.
मग इव्हेन्ट मॅनेजमेंट फर्म चालवली. (खरी बिझनेसची सुरुवात एकदम लहानपणी शाळेत असताना झाली, ते कधी नंतर सांगेल).मग रेडिओमध्ये चार वर्ष रेडिओ जॉकी म्हणून काम केलंय, जिथं शोज लिहिणं, जाहिराती लिहिणं, जिंगल्स लिहिणं, प्रोमो लिहिणं अशा असंख्य गोष्टी केल्या.
तेही आकाशवाणीसाठी वेगळं, प्रायव्हेट रेडिओसाठी वेगळं. दोन्हीकडं लिहिण्याची पद्धत वेगळी लागते, शोज, जाहिराती, प्रोमो - सगळ्यात.आकाशवाणीच्या जाहिराती वेगळ्या - शोज वेगळे - प्रायव्हेटचे शोज वेगळे - जाहिराती पूर्ण वेगळ्या.
मग मार्केटिंगचा प्रवास सुरु झाला, त्यात मग प्रिंट ads, होर्डिंग, वेबसाईटचा Content, सोशलचा Content, (Content Writing आणि Copywriting मध्ये प्रचंड फरक आहे, तोही नंतर कधी बोलेल), व्हिडीओ स्क्रिप्ट्स, युट्युब व्हिडीओ होस्टिंग, युट्युब लाईव्ह, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या एजन्सी, स्टार्टअप्स, मीडिया कंपनीसोबत केल्या.
आणि मग २०२३ डिसेंबरमध्ये माझ्या स्वतःच्या IG पेजवर Content Creation सुरु केलं. जे तुम्ही इंस्टाग्रामवर पाहू शकता किंवा तिथूनच इथे आला असाल.
एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी हाताखालून गेल्या आहेत, प्रत्यक्षात पब्लिश झाल्या आहेत, कुठे काय वर्क करतं हे व्यवस्थित शिकलो, स्वतःच्या पेजवर हजारो प्रयोग केले आणि मगच हजारो-लाखो लोकांना या गोष्टी सांगतोय आणि त्यांचा बिझनेस, लॉयल कस्टमर्स, सेल्स, रेव्हेन्यू या गोष्टी मिळवून देतोय.
तुमच्या बिझनेससाठी कस्टमर आणि सेल्स मिळवणं शिकायचं असेल तर खाली पर्याय आहेत आणि जर माझ्या टीमकडून Execution करून हवं असेल तर खाली फॉर्म आहे.